सुर्लातील भीषण अपघातात कारचालक महिला ठार

0
95

न्हावेली – सुर्ला मुख्य रस्त्यावरील घोडेश्वर जवळ काल सकाळी कार व प्रवासी बस यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात सौ. नविता सुबोध आमोणकर (३७) या सुर्ला येथील महिलेचा मृत्यू झाला.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला. नविता आमोणकर या जीए ०४ सी – ०८१५ या कार ने घराकडून साखळी येथे त्यांच्या दुकानावर जात असताना समोरून येणार्‍या बेळगाव मडगाव प्रवासी बस क्र. जीओ ०३ एन ३४३४ यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. त्यात कारचा चेंदामेंदा होऊन सौ. आमोणकर गंभीर जखमी झाल्या. १०८ व अग्निशमन दल व स्थानिकांनी त्यांना साखळी इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी नविता यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.