Home बातम्या पत्नीचा खून; पती फरार

पत्नीचा खून; पती फरार

0

पर्रा येथे परवा रात्री पावणे बाराच्या सुमारास घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात रवी राठोड (२९) मूळ बिजापूर याने पत्नी गीता राठोड (२५) हिचा गळा चिरून व पोटात सुरा खुपसून खून केला व फरार झाला.

याबाबत म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार परवा रात्री रवी व गीता राठोड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी रागाच्या भरात रवी राठोड याने प्रथम आपल्या पत्नीच्या गळ्यावर सुरा लावून गळा चिरला व नंतर पोटाच्या बाजूला सूरा खुपसून कोथळा बोर काढला. शिवाय दोन्ही हातांवर वार केले. नंतर त्याने घटनास्थळाहून पलायन केले.

ही घटना रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली. म्हापसा पोलिसांनी याची माहिती मिळताच निरीक्षक तुषार वेर्णेकर, उपनिरीक्षक गौतम सांळूके, सुशांत चोपडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. खून करून पलायन केलेल्या रवी राठोडचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. म्हापसा पोलीस स्थानकाचे एक पोलीस पथक त्याच्या शोधार्थ बिजापूर येथे गेले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

राठोड दांपत्य आपल्या दोन मुलांसमवेत पर्रा येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांचे बर्‍याच दिवसांपासून तंटे होत होते.