गोवा संघाचे नेतृत्व राहुल मेहताकडे

0
114

>> विनू मांकड १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

पुदुचेरी येथे १ ऑक्टोबरपासून खेळविल्या जाणार्‍या विनू मांकड १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी काल गुरुवारी गोवा क्रिकेट संघटनेने गोव्याच्या संघाची घोषणा केली. मागील मोसमात या स्पर्धेत गोव्याकडून सर्वाधिक बळी घेतलेल्या राहुल मेहता याच्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

गोव्याचा संघ पुढीलप्रमाणे ः राहुल मेहता, कौशल हट्टंगडी, शशांक वेरेकर, गौरीश कांबळी, मोहित रेडकर, आयुष वेर्लेकर, उदित यादव, ऋत्विक नाईक, दिगेश रायकर, पीयुष यादव, शुभम तारी, जगदीश पाटील, मनीष पै काकोडे, हर्ष जेठाजी, शादाब खान, फैझ सुलेमान, बीपिन पगारे व आदित्य राऊत देसाई.

मागील मोसमात आलम खान याने चमकदार कामगिरी करताना ४३च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह २५८ धावा केल्या होत्या. त्याचा अपवाद वगळता एकालाही प्रभाव पाडणे शक्य झाले नव्हते. गोलंदाजीत राहुल मेहता याने ४.४६च्या इकॉनॉमीने व २८.६०च्या सरासरीने १० बळी घेत चांगली कामगिरी केली होती.

गोव्याचे सामने २०१९
वि. मेघालय, १ ऑक्टोबर, वि. अरुणाचल प्रदेश, ५ ऑक्टोबर, वि. सिक्कीम, ७ ऑक्टोबर, उत्तराखंड क्रिकेट संघटना, ८ ऑक्टोबर, वि. चंदीगड, १० ऑक्टोबर, वि. मिझोरम क्रिकेट संघटना, १४ ऑक्टोबर, वि. पुदुचेरी क्रिकेट संघटना, १७ ऑक्टोबर, वि. नागालँड, २१ ऑक्टोबर, वि. मणिपूर, २३ ऑक्टोबर

२०१८ हंगामातील गोव्याची विनू मांकड स्पर्धेतील कामगिरी (७ पराभव, ० विजय)

गोवा ४९ षटकांत सर्वबाद १९९ पराभूत वि. तमिळनाडू ३७.५ षटकांत ३ बाद २०२ (तमिळनाडू ७ गड्यांनी विजयी)
राजस्थान ४९.३ षटकांत सर्वबाद २६३ वि. वि. गोवा ३९ षटकांत सर्वबाद १३५ (राजस्थान १२८ धावांनी विजयी)
हिमाचल प्रदेश ५० षटकांत ६ बाद २४९ वि. वि. गोवा ५० षटकांत ६ बाद १५६ (हिमाचल ९३ धावांनी विजयी)
सौराष्ट्र ५० षटकांत ८ बाद २३३ वि. वि. गोवा ४२.२ षटकांत सर्वबाद १४८ (सौराष्ट्र ८५ धावांनी विजयी)
जम्मू काश्मीर ४८.५ षटकांत सर्वबाद २२१ वि. वि. गोवा ४६.५ षटकांत सर्वबाद १८१ (जम्मू कश्मीर ४० धावांनी विजयी)
गोवा ४९.५ षटकांत सर्वबाद २४८ पराभूत वि. ओडिशा ४९ षटकांत ४ बाद २५२ (ओडिशा ६ गड्यांनी विजयी)
केरळ ५० षटकांत ५ बाद २४२ वि. वि. गोवा ४७.३ षटकांत सर्वबाद १५४ (केरळ ८८ धावांनी विजयी)