चंदीमलचा समावेश

0
126

श्रीलंकेच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध १४ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या २२ सदस्यीय संघात माजी कर्णधार दिनेश चंदीमल याचा समावेश केला आहे. ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर कसोटीमधील लंकेची ही पहिलीच मालिका असेल. निवड समितीने २२ खेळाडू जाहीर केले असले तरी येत्या काही दिवसांतच खेळाडूंची संख्या १५ पर्यंत कमी केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीमुळे चंदीमलला कसोटी संघातील स्थान गमवावे लागले होते. तसेच संथ फलंदाजीमुळे त्याला विश्‍वचषकातही निवडण्यात आले नव्हते. चंदीमलसह ऑफस्पिनर अकिला धनंजया व ऑफस्पिनर दिलरुवान परेरा यांचा पुनरागमन झाले आहे. केवळ पाच कसोटी नावावर असलेल्या धनंजया याने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर अनुभवी परेराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे संघातील जागा गमवावी लागली होती.

निवडण्यात आलेले २२ खेळाडू ः दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंदीमल, लाहिरु थिरिमाने, कुशल मेंडीस, कुशल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डीसिल्वा, अँजेलो परेरा, ओशादा फर्नांडो, दनुष्का गुणथिलका, शेहान जयसूर्या, चमिका करुणारत्ने, दिलरुवान परेरा, अकिला धनंजया, लसिथ एम्बुलदेनिया, लक्षन संदाकन, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, विश्‍वा फर्नांडो, कासुन रजिता व असिथा फर्नांडो.