Home बातम्या ‘गोव्याला घटक राज्य बनविण्यात आपलाही वाटा’

‘गोव्याला घटक राज्य बनविण्यात आपलाही वाटा’

0

गोव्यातील भाजप, गोवा विकास पार्टी, मगो, अपक्ष व कॉंग्रेस या सर्वच आमदार खासदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आपण गोव्यात आलो असून त्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

गोव्यात कॉंग्रेसचे फक्त ९ आमदार आहेत त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी गोव्यात आले नाहीत. परंतु आपण प्रत्येक मताला महत्त्व देत असल्याचे संगमा यांनी सांगितले.

गोव्यातील ख्रिस्ती समाजाने गेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. त्यामुळे कॉंग्रेस हाच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, हे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी सुधाकर रेड्डी यांच्या विधानास तथ्य राहिलेले नाही, असे संगमा यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. आपण प्रत्येक आमदार व खासदाराचे मत मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

वरील निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसल्याने आमदारांना पक्षाचा व्हिप जारी करणे शक्य नसते. यावेळी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेगळेच महत्त्व आले आहे. अनेक राज्यांमध्ये जनताच आपआपल्या आमदार, खासदारांकडे संगमा यांनाच मते देण्याची विनंती करीत आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते, असे संगमा म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रश्‍नावर कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे दि. १९ रोजी होणार्‍या निवडणुकीच्या वेळी चमत्कार होऊ शकेल, असे भाजपचे राष्ट्रीय नेते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.