पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केल्यानंतर कर्नाटकातील दहा ठिकाणांबाबत निर्णय कर्नाटक सरकारने पुढे ढकलला आहे.
काल मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत हा विषय यादीत होता. मात्र तो संवेदनशील असल्याने त्यावर चर्चा टाळण्याचे ठरल्याचे सूत्रांकडून समजते. वनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी सांगितले की, याबाबत बुधवारी निर्णय होणार असून वारसा स्थळे बनल्यासे तेथील आदीवासींना बाहेर काढावे लागेल.