गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय संचालक एस. व्ही. नाईक (प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा), पर्यटन संचालक स्वप्नील नाईक (गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय संचालक), उत्तर गोवा अतिरिक्त संचालक अमरसेन राणे (दक्षता खात्याचे अतिरिक्त संचालक), दक्षता खात्याचे अतिरिक्त संचालक सुनील मसुरकर (महिला आणि बालक विकास खात्याचे संचालक), मडगावचे पालिका मुख्य अधिकारी जगन्नाथ भिंगी (सहकार निबंधक),
सहकार निबंधक पी. के. वेळीप (गोवा राज्य माहिती आयुक्त), आयटी संचालक श्रीनेट कोठावळे (मुख्य अधिकारी मडगाव पालिका), खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एस. देसाई (उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी), अतिरिक्त पंचायत संचालक जयंत तारी (अतिरिक्त पंचायत संचालक-१), आरोग्य खात्याचे प्रशासकीय संचालक व्हेनसियो फुर्तादो (गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे खास भूसंपादन अधिकारी), काणकोणचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उत्तर गोवा २), मुरगावचे उपजिल्हाधिकारी एल. एस. पेरेरा (अतिरिक्त पंचायत संचालक २), आरोग्य खात्याचे अवर सचिव बी.एस. कुडाळकर (आरोग्य खात्याचे प्रशासकीय संचालक), दक्षिण गोवा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक रेडकर (खादी ग्रामोद्योगाचे मुख्य अधिकारी), गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय उपसंचालक (गोवा राज्य अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक). पर्यटन संचालक पदावरून स्वप्नील नाईक यांना हटविल्याने सदर पदाचा ताबा आयएएस सचिव मॅथ्यू सामुएल यांच्याकडे दिला आहे. तसेच एआरडीचे संयुक्त सचिव विजय परांजपे यांच्याकडे समाजकल्याण खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे.
पी. के. वेळीप काणकर राज्य माहिती सचिव
सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे सहकार निबंधक, पी. के. वेळीप काणकर यांची गोवा राज्याच्या माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काणकर यांना अत्यंत प्रामाणिक व कार्यक्षम व अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जाते. वरील पदासाठी शिक्षण तज्ज्ञ तथा गोवा शालान्त शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष पी. आर. नाडकर्णी यांचे नाव निवडले होते. परंतु नाडकर्णी यांनी वरील पद स्वीकारण्यास नकार दिला होता.