Home बातम्या बोगस जन्मदाखला प्रकरणी गणेशराजवर सहा वर्षांची बंदी

बोगस जन्मदाखला प्रकरणी गणेशराजवर सहा वर्षांची बंदी

0

ज्युनियर संघाततर्फे खेळण्यासाठी जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांच्या पुत्राने सादर केलेल्या बोगस जन्मदाखला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जीसीएने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीच्या निर्णयानंतर काल, सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.

गणेशराजसंबंधात बरेच वादंग असून बोगस जन्मदाखला प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे जीसीएचे सरचिटणीस प्रसाद फातर्पेकर यानी सांगितले.

जीसीएचे सदस्य शेखर साळकर यानी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसानी गणेशराज, त्याचे पिता तथा माजी अर्थमंत्री दयानंद नार्वेकर आणि आई सुषमा यांच्याविरुद्ध बोगस जन्म प्रमाणपत्रासंबंधात आरोपपत्र तयार केले होते. गणेशराज आणि अनिश नार्वेकर या दोन नावांसह त्याने आंतरराज्य स्पर्धांत गोव्याच्या कनिष्ठ संघांचे प्रतिनिधीत्व केले होते.