कुंकळकरांची निवड दिल्लीतून : तेंडुलकर

0
118

पणजी मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आम्ही नवी दिल्लीला दोन नावे पाठवली होती. त्यात पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व पक्षाचे दिवंगत नेते आणि पणजी मतदारसंघाचे सुमारे २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलेले आमदार व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर यांच्या नावाचा समावेश होता, असे काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

पक्षाने दोन्ही नावांचा विचार करून शेवटी सिद्धार्थ कुंकळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
उमेदवारी जाहीर झालेला असल्याने आता त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी काम करणार असल्याचे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.