पणजीत मनोहर पर्रीकरांविषयी सहानुभूती नाही : चोडणकर

0
83

पणजीतील मतदारांमध्ये दिवंगत भाजप नेते व २५ वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले मनोहर पर्रीकर यांच्याविषयी सहानुभूती नसल्याचे दिसून आल्यानेच भाजपने उत्त्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याचे टाळल्याचे प्रदेश कॉंगे्रस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले.

मतदारसंघात पर्रीकर यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे की काय हे जाणून घेण्यासाठीच भाजपने उत्त्पल पर्रीकर यांचे नाव पुढे केले होते. मात्र, ती नसल्याचे दिसून आल्यानेच भाजपने त्यांच्याऐवजी सिद्धार्थ कुंकळकर यांना उमेदवारी दिल्याचे चोडणकर म्हणाले.

पर्रीकर यांच्याविषयी जर मतदारसंघात सहानुभूतीची लाट असली तर उत्त्पल पर्रीकर यांना भाजपने विनाविलंब उमेदवारी जाहीर केली असती. आता तर त्यांच्याऐवजी कुंकळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे सांगून पणजीत भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचे चोडणकर म्हणाले. पणजीतील काही भाजप नेत्यांनी यापूर्वीच कॉंग्रेस नेते बाबुश मोन्सेर्रात यांच्यासाठी काम करणे सुरू केले असल्याचा दावाही चोडणकर यांनी केला.