‘दामोदर’ला सॉफ्टबॉल जेतेपद

0
134

गुडी पारोडाच्या दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने १९ वर्षांखालील मुलींच्या आंतर उच्च माध्यमिक सॉफ्टबॉल स्पर्धेचे राज्य विजेतेपद पटकावले आहे. क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दोनापावल येथील अवर लेडी ऑफ रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाचा ६-१ अशा होम्सनी पराभव केला.

मध्यंतरापर्यंत दामोदरचा संघ ३-० असा आघाडीवर होता. राज्य विजेत्या संघाकडून क्लिफा फर्नांडिस व बबिता निस्तानी यांनी प्रत्येकी दोन तर सिया मिनेझिस व पूजा येलवार यांनी प्रत्येकी एका होम्सची नोंद केली.
रोझरीकडून एकमेव होम लीना गावडे हिने नोंदविला. तत्पूर्वी दक्षिण गोवा विभागीय अंतिम फेरीत दामोदरने दीपविहार उच्च माध्यमिकचा ११-० असा पराभव करत राज्य विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळविले होते.
शारीरिक शिक्षक जयकृष्ण देसाई व लक्ष्मण प्रभुदेसाई यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.