खरे तर १ जुलैपासूनच या क्रमांकपट्ट्या वाहनांवर बसवण्याचे काम हाती घेण्याचा आमचा विचार आहे. पण ते शक्य झाले नाही तर कोणत्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ते काम हाती घेण्यात येईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
उच्च सुरक्षा क्रमांक पट्ट्यांसाठी एकूण ८ कंपन्यानी निविदा भरल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ दोनच कंपन्या पात्र ठरलेल्या आहेत. मात्र, हे कंत्राट कुणाला द्यायचे त्याबाबत अभ्यास चालू असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या अन्य अटी तपासून पाहिल्या जात असल्याचे ते म्हणाले.उत्सव सेफ्टी सिस्टम प्रा. लिमिटेड (नवी दिल्ली) व सिलेक्स टेक्नोलॉजिस प्रा. लिमिटेड या त्या दोन कंपन्या असल्याचे ते म्हणाले. उत्सवने दुचाकीला (मोटारसायकल) क्रमांक पट्टी बसवण्यासाठी २४२ रु; दुचाकीसाठी (स्कुटर) २३० रु., तीन चाकी वाहनावर पट्टी बसवण्यासाठी २६८ रु., हलकी वाहनाना क्रमांक पट्टी बसवण्यासाठी ४१५ रु., तर अवजड वाहनांना क्रमांकपट्टी बसवण्यासाठी ४६३ रु., असे दर ठरवले आहेत. सिलेक्स टेक्नोलॉजिस प्रा. लिमिटेड (कोलकाता) या कंपनीने दुचाकीसाठी २४४, तीनचाकीसाठी २७० रु., अवजड प्रवासी वाहनासाठी ४४६, रु. तर अवजड मालवाहू वाहनासाठी ४४६ रु., असे दर ठरवले असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. अजूनही या कंपन्यांनी आपले दर आणखी खाली आणावेत यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.