पेडणे किनार्‍यावरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी

0
103
केरी येथील समुद्रकिनार्‍यावरील शॅकमध्ये शिरलेले समुद्राचे पाणी.

पेडणे ( प्रतिनिधी )
काल बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास तसेच संध्याकाळी समुद्राचे पाणी अचानक मोरजी, मांद्रे, हरमल केरी किनारी भागातील शॅक रेस्टोरंटमध्ये घुसल्याने व्यावसायिकांची धांदल उडाली. सध्या कुटिरे उभारण्याचे काम सुरू असून या कुटिरांमध्ये समुद्राचे पाणी थेट आत शिरले.
किनारी भागात पर्यटन खात्यातर्फे किनार्‍यावर शॅक उभारण्यासाठी पर्यटन खात्यातर्फे ज्या ठिकाणी समुद्राचे भरतीचे पाणी येते त्याच ठिकाणी सरकार परवाने देते. गेल्यावर्षी ऐन पर्यटन हंगामात पाणी घुसून किमान दोन कोटींपेक्षा जास्त हानी झाली होती. ती भीती आजही व्यवसायिकांमध्ये आहे. काल पाणी आले त्याठिकाणी शॅक उभारण्याचे काम सुरू होते. मात्र व्यवसाय सुरू झाला नव्हता. अन्यथा गत वर्षाची पुनरावृत्ती झाली असती. कालच्या पाण्यामुळे हानी झाली नसली तरी भीती मात्र कायम आहे.