पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद

0
112

>> जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

भारताच्या पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याकडून २१-१९, २१-१० असा पराभव स्वीकारवा लागला.

मरिनचे हे तिसरे जागतिक अजिंक्यपद ठरले. यापूर्वी तिने जकार्तात २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले होते.
नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनमध्येही सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सिंधूने चांगली सुरुवात करताना महिल्या गेममध्ये प्रारंभी आघाडी मिळविली होती. परंतु त्यानंतर डावखुर्‍या मरीनने आपले वर्चस्व प्रस्तापिक करताना सिंधूला जोरदार झुंज देत हा गेम २१-१९ असा जिंकला. तर दुसर्‍या गेमध्ये मरिनने आपले वर्चस्व कायम ठेवताना सिंधूला सहज पराभूत केले.

यापूर्वी सिंधू आणि मरिन ११ वेळा समोरासमोर ठाकल्या होत्या. त्यात सिंधूने ५ वेळा तर मरिनने ६ वेळा बाजी मारली होती. जूनमध्ये झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेतही सिंधूला अंतिम लढतीत मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मरिनने सिंधूवर मात करीत सुवर्ण पदक मिळविले होते. आणि आता पुन्हा एकदा ती सिंधूवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या द्वितीय मानांकित अकाने यामागुचीवर २१-१६, २४-२२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.