मिकी पाशेको युगोडेपाच्या वाटेवर

0
108

आगामी विधानसभा निवडणूक नुवे मतदारसंघातून युगोडेपा पक्षाच्या तिकिटावर लढविणार असून पत्नी कुठ्ठाळी मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी काल येथे सांगितले. लवकरच युगोडेपात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परराज्यांतून येणार्‍या मासळीवर १५ दिवसांसाठी घातलेली बंदी वर्षभर वाढवण्याची मागणी त्यांनी केली. मासळीची तपासणी करून नंतरच विक्रीस परवानगी द्यावी असे त्यांनी सांगितले.