Home बातम्या ‘जळता गोमंतक’ पुन्हा रंगमंचावर

‘जळता गोमंतक’ पुन्हा रंगमंचावर

0

३१ रोजी कला अकादमीत प्रयोग

कै. सखाराम बापू बर्वे लिखित गोवा मुक्तिसंग्रामावर आधारीत ‘जळता गोमंतक’ या मराठी नाटकाचा गुरुवार दि. २४ रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर स्वातंत्र्यसैनिक नागेश करमलीच्या हस्ते सुमूहूर्त झाला. हे नाटक कला अकादमी आणि कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहयोगाने अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दि. ३१ मे रोजी संध्या. ७.३० वा. सादर होणार आहे.

ऍड्. श्याम अनंत शेट्ये यांनी या नाटकाची निर्मिती केली असून श्री देव रघुगोनशेट सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पेठेचावाडा- कोरगांवतर्फे हे नाटक सादर होणार आहे. सुमूहूर्तावेळी दिग्दर्शक अभय जोग, ऍड्. श्याम अनंत शेट्ये, राजमोहन शेट्ये, नितीन कोलवेकर, कुलदीप कामत, रत्नाकर गाड, दत्तात्रय बर्वे, विशाल गावस, गजानन झर्मेकर, अनुजा पुरोहित, विष्णू गावस, गोपिनाथ गावस, मंगला जांभळे, दीपक बर्वे, धनंजय फाळकर उपस्थित होते.

नाटकाचे दिग्दर्शन प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक अभय जोग यांनी केले आहे. गोव्यातील प्रसिध्द नाट्य, सिने आणि गोव्यातील वेगवेगळ्या चॅनलवर भूमिका केलेले बहुआयामी कलाकार या नाटकामध्ये भूमिका करणार आहेत. वेगवेगळ्या नाटकातून भूमिका केलेले ऍड्. श्याम अनंत शेट्ये, राजमोहन शेट्ये, गोव्याच्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारे प्रसिध्द नाट्य कलाकार नितीन कोलवेकर, कुलदीप कामत, रत्नाकर गाड, दत्तात्रय बर्वे, सिने आणि नाट्यकलाकार विशाल गावस, गजानन झर्मेकर, अनुजा पुरोहित, विष्णू गावस, गोव्यातील प्रुडंट मिडिया ‘मांड’ फेम गोपिनाथ गावस भूमिका करणार आहेत.

मंगला जांभळे, दिपक बर्वे, चंद्रशेखर बर्वे, धनंजय फाळकर यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे. गोमंतकीयांनी या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी सोडू नये असे आवाहन श्री देव रघुगोनशेट सांकृतिक कला क्रीडा मंडळ, पेठेचावाडा- कोरगांवतर्फे करण्यात आले आहे.