कोहलीला ‘स्लिप डिस्क’ आजार नसून केवळ ‘नेक स्प्रेन’चा त्रास

0
60

> > बीसीसीआयकडून खुलासा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मणक्याचा आजार झाल्याची चर्चा काल दिवसभरात बरीच रंगली. परंतु त्यावर पूर्णविराम लावताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला ‘स्लिप डिस्क’ (मणक्याचा आजार) नव्हे तर केवळ ‘नेक स्प्रेन’चा (मानेमध्ये चकम) त्रास असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोहलीच्या मानेत चकम आली असल्याने त्याला इंग्लंड दौत्यातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. कारण त्याला डॉक्टरे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेटमधूनही माघार घेतली असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले आहे. इंग्लंड दौर्‍यापूर्वी सराव व्हावा व तेथील वातावरणात समरस व्हावे यासाठी कोहली काऊंटीमध्ये सरतर्फे खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासंदर्भात त्याने करारही केला होता. १५ जूननंतर विराटची तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या इंग्लंड दौर्‍यातील सहभागावर बीसीसीआय निर्णय घेणार आहे.