नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्सशी

0
132
Dinesh Karthik captain of the Kolkata Knight Riders and Kuldeep Yadav of the Kolkata Knight Riders before the start of the match twenty nine of the Vivo Indian Premier League 2018 (IPL 2018) between the Royal Challengers Bangalore and the Kolkata Knight Riders held at the M. Chinnaswamy Stadium in Bangalore on the 29th April 2018. Photo by: Vipin Pawar /SPORTZPICS for BCCI

>> क्वॉलिफायर-२ लढत आज

दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात आज ईडन गार्डन्स मैदानावर इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) क्वॉलिफायर-२ लढत रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ २७ रोजी होणार्‍या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाशी जेतेपदासाठी लढणार आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसंघाने पहिल्या क्वॉलिफायर लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघावर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मध्यफळीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गुक्तक्त्यात अग्रस्थानी राहिलेल्या सनराझर्स हैदरबादने सलग चार सामने गमावले आहेत. त्यात महत्त्वपूर्ण अशा क्वॉलिफायर-१ लढतीचा समावेश होता. त्यामुळे ही बाब कर्णधार केन विल्यमसनसाठी खरोखरच चिंतेचा विषय असेल. स्पर्धेतील भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा अशा सर्वोत्कृष्ट द्रुतगती गोलंदाजी आक्रमण असलेल्या सनरायझर्सकडे रशिद खानसारखा विकेट टेकर फिरकीपटू आहे. परंतु सध्याचे वातावरण हे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक व कंपनीसाठी अनुकूल असल्याचे दिसून येते. त्यातच ते घरच्या मैदानानवर खेळणार असल्याने ती त्यांच्यासाठी एक जमेची बाजू असेल. त्यामुळे विल्यमसनच्या नेतृत्वाखालील नाईट रायडर्सला रोखत पुन्हा विजयी लय मिळवावी लागेल.

सनरायझर्स संघाने यंदा १८ गुण प्राप्त करीत सर्वांत प्रथम बाद क्लॉलिफायर-१साठी पात्रता मिळविली होती. परंतु त्यानंतर चेन्नई, आरसीबी, केकेआर आणि कॉलिफायर-१मध्ये पुन्हा चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादची मुख्य समस्या म्हणजे त्यांची फलंदाजी. जी पूर्णतः कर्णधार केन विल्यमसनवर अवलंबून आहे. विल्यमसनने आतापर्यंत ५७.०५च्या सरासरीने ६८५ धावा बनविल्या असून तो ऑरेंज कपधारक आहे. केनच्या साथीत डावखुरा सलामीवर शिखर धवन चालला तर हैदाराबाद कोलकात्यासमोर माठी धावसंख्या उभी करू शकतो. परंतु त्याला गेल्या सामन्यात आपले खाते खोलता आले नव्हते. त्यामुळे तो पुन्हा लय मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. त्याने आतापर्यंत ४३७ धावा केलेल्या आहेत. तसेच मनीष पांडे (२८४), श्रीवत्स गोस्वामी, युसूफ पठाण (२१२)कडेही मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास त्यांच्याकडे सिद्धार्थ कौलच्या (१९ बळी) चांगला द्रुतगती गोलंदाज आहे. तसेच भुवनेश्वर कुमार (९ बळी) व रशिद खानकडेही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याची क्षमता आहे.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात कोणताही बदल करण्याची शक्यता कमीच आहे. कार्तिकने १५ सामन्यांतून ५४.४४च्या सरासरीने धावा बनविलेल्या आहेत. गेल्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण ५० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यांच्याकडे चांगला फलंदाजी क्रम आहे. सलामीवीर सुनील नारायण चांगली सुरुवात करून देत आहे. ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल सारखे फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर भारी पडू शकतात. रसेलने गेल्या सामन्यात २५ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी करीत संघाला क्वॉलिफायर-२मध्ये प्रवेश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

गोलंदाजीचा विचार करायला गेल्यास प्रसिद्ध कृष्णा आणि आंद्रे रसेल चांगला द्रुतगती मारा करीत आहेत. कुलदीप पवार आणि पियुष चावला यांची फिरकीही प्रभावी ठरत आहे. मात्र सुनील नारायणला चांगली लय मिळणे गरजेचे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो आपल्या गोलंदाजीची कमाल अपेक्षेप्रमाणे दाखवू शकलेला नाही. दोन्ही संघांनी राऊंड रॉबिन लीगमध्ये एका-मेकाविरुद्ध लढत जिंकली आहे. आता यापैकी कोणता संघ २७ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध होणार्‍या अंतिम सामन्यात धडक देतो हे आज कळणार आहे.

संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः कोलकाता नाईट रायडर्स ः दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नारायण, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव, पियुष चावला, नीतीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, मिचेल जॉनसन, शुभमन गिल, आर विनय कुमार, रिंकु सिंग,कॅमरन डेलपोर्ट, जॅवोन सीअर्ल्स, अपूर्व वानखेडे, ईशांक जग्गी व टॉम कुर्रन.
सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृध्दिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बासिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अग्रवाल, आलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि ख्रिस जॉर्डन.