पाच वर्षांनंतर इंग्लंड अव्वलस्थानी

0
134

>> आयसीसी वनडे क्रमवारी

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड संघाने पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१३ सालच्या जानेवारी महिन्यानंतर प्रथमच इंग्लंडला अव्वलस्थान मिळविणे शक्य झाले आहे. त्यांनी टीम इंडियाला दुसर्‍या स्थानी ढकलले आहे. २०१५सालच्या विश्‍वचषकातील खराब कामगिरीनंतर ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडने वनडेमध्ये आपली कामगिरी कमालीची उंचावली आहे. याच बळावर त्यांनी ८ गुणांची कमाई करताना १२५ रेटिंग गुणांसह विराट कोहलीच्या टीम इंडियाला मागे टाकले आहे. एका गुणांच्या नुकसानीसह भारताच्या खात्यात १२२ गुण आहेत. ११३ गुण घेत दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसर्‍या क्रमांकावर आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या सात स्थानांत कोणताही बदल झालेला नाही. अफगाणिस्तानने श्रीलंकेला मागे टाकत आठवे स्थान प्राप्त केले आहे.

आयसीसी वनडे क्रमवारी ः १. इंग्लंड १२५ गुण (+ ८), २. भारत १२२ (-१), ३. द. आफ्रिका ११३ (-४), ४. न्यूझीलंड ११२ (-२), ५. ऑस्ट्रेलिया १०४ (-८), ६. पाकिस्तान १०२ (+ ६), ७. बांगलादेश ९३ (+ ३), ८. श्रीलंका ७७ (-७), ९. वेस्ट इंडीज ६९ (-७), १०. अफगाणिस्तान ६३ (+ ५), ११. झिंबाब्वे ५५ (+ ४), १२. आयर्लंड ३८ (-३).
आयसीसी टी-२० क्रमवारी ः पाकिस्तान १३० गुण (-), २. ऑस्ट्रेलिया १२६ (-), ३. भारत १२३ (+ २), ४. न्यूझीलंड ११६ (-), ५. इंग्लंड ११५ (+ १), ६. द. आफ्रिका ११४ (+ ३), ७. वेस्ट इंडीज ११४ (+ ३), ८. अफगाणिस्तान ८७ (-१), ९. श्रीलंका ८५ (-४), १०. बांगलादेश ७५ (-२).