राशिद खान आणि शाकिब अल हसन यांच्या जादुई फिरकीच्या जोरावर सनराझर्स हैदराबाद संघाने सलग दुसर्यांदाच कमी धावसंख्या बनवूनही प्रतिस्पर्धी संघावर मात करीत शानदार विजय नोंदविला. हैदराबादने १३२ अशी धावसंख्या उभारली होती. त्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ ११९ धावांवर गारद झाला.
१३३ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लोकेश राहुल (३२) आणि ख्रिस गेल (२३) यांनी पंजाबला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु हे दोघे तंबूत परतल्यानंतर उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने पंजाबचा डाव १९.२ षट्कांत ११९ धावांवर संपुष्टात आला. मयांग अग्रवाल (१२), करुण नायर (१३) आणि मजीब उर रेहमान (१०) या अन्य तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. हैदराबादतर्फे राशिद खान सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १९ धावांत ३ तर शाकिब, थंपी व संदीपने प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरविताना अंकित राजपूतसह इतर गोलंदाजांनी सूत्रबद्ध मारा करीत सनरायझर्स हैदराबाद संघाला ६ बाद १३२ धावांवर रोखण्यात यश मिळविले. मनिष पांडेने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. शाकिब अल हसनने २८ तर युसुफ पठाणने संयमी नाबाद २१ धावा जोडल्या. हैदबादची सुरुवात एकदम खराब झाली. युवा तेज गोलंदाज अंकित राजपूतने शिखर धवन (११), केन विल्यमसन (०) आणि वृद्धिमन साहा (६) या आघाडीच्या तीन फलंदाजांना हैदराबादला प्रारंभीच जोरदार हादरे दिले. त्यातून त्यांना सावरण्यासाठी बराव वेळ लागला. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अंकितने १४ धावांत ५ बळी मिळविले. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये ५ बळींचे घबाड मिळविणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तर मजीब उर रेहमानने १ गडी बाद केला.
धावलफक
सनरायझर्स हैदराबाद ः शिखर धवन झे. करुण नायर गो. अंकित राजपूत ११, केन विल्यमसन झे. रविचंद्रन अश्विन गो. अंकित राजपूत ०, वृद्धिमन साहा झे. अँड्र्यू टाय गो. अंकित राजपूत ६, मनिष पांडे त्रिफळाचित गो. अंकित राजपूत ५४, शाकिब अल हसन झे. मयांक अग्रवाल गो. मुजीब उर रेहमान २८, युसुफ पठाण नाबाद २१, मोहम्मद झे. मयांक अग्रवाल गो. अंकित राजपूत नाबाद ४.
अवांतर ः ८. एकूण २० षट्कांत ६ बाद १३२ धावा.
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४/०/१४/५, बरिंदर सरन ३/०/२७/०, रविचंद्रन अश्विन ४/०/३४/०, मनोज तिवारी १/०/१०/०, मजीब उर रेहमान ४/०/१७/१, ऍड्रू टाय ४/०/२८/०.
किंग्ज इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल त्रिफळाचित गो. राशिद खान ३२, ख्रिस गेल झे. व गो. बासिल थंपी २३, मयांक अग्रवाल झे. मनिष पांडे गो. शाकिब अल हसन १२, करुण नायर पायचित गो. रशिद खान १३, ऍरॉन फिंच
झे. मनिष पांडे गो. शाकिब अल हसन ८, मनोज तिवारी झे. केन विल्यमसन गो. संदीप शर्मा १, रविचंद्रन अश्विन झे. केन विल्यमसन गो. रशिद खान ४, ऍड्रू टाय पायचित गो. संदीप शर्मा ४, बरिंदर सरन धावचित (वृद्धिमन साहा) २, अंकित राजपूत त्रिफळाचित बासिल थंपी ८, मजीब उर रेहमान नाबाद १०.
अवांतर ः २. एकूण १९.२ षट्कांत सर्वबाद ११९ धावा.
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४/०/१७/२, मोहम्मद नाबी २/०/२४/०, सिद्धार्थ कौल ४/०/२५/०, बासिल थंपी २.२/०/१४/२, राशिद खान ४/०/१९/३, शाकिब अल हसन ३/०/१८/२.