पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सचिन चौधरीला कांस्य

0
107

२१व्या राष्ट्रकुल खेळात काल भारताला सहाव्या दिवशी पॅरा पॉवरलिफ्टर सचिन चौधरीने दुसरे पदक मिळवून दिली. काल नेमबाज हीना सिंधूने भारताला सहाव्या दिवशीचे पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तर त्यानतंर पॅरा पॉवरलिफ्टिंच्या हेवीवेट विभागात ३४ वर्षीय मेरठच्या सचिन चौधरीने अंतिम फेरीत १८१ किलो वजन उचलत तिसर्‍या स्थानासह कांस्य पदक मिळविले.
हे भारताचे सहावे कांस्य तर एकूण २१वे पदक होय. नायजेरियाच्या इब्राहिम अब्दुल्ला अजिजने (१९१.९) सुवर्ण पदक तर मलेशियाच्या यी खी जोंगने (१८८.७) रौप्य पदक प्राप्त केले.

वैष्णवी अंतिम फेरीत
दरम्यान, भारताची महिला पॅरा जलतरणपटू वैष्णवी विनोद जगतापने आकर्षक कामगिरी करताना महिलांच्या एस-८ ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑप्टस एक्वेटिक संेंटरमध्ये आयोजित या स्पर्धेतील हीट-१मध्ये वैष्णवीने ४१.६३ सेकंदाची वेळत देत सहाव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली. या हीटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या लाकेशा पीटरसनने ३१.४१ सेकंदाची वेळ देत प्रथम स्थान मिळविले.