
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभी दिनी भारताचा वेटलिफ्टर गुरुराजा याने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले. गुरुराजाने पहिल्या प्रयत्नात १११ किलो वजन उचलले. उत्तरोत्तर त्याने ही कामगिरी उंचावत नेली आणि तिसर्या प्रयत्नात २४९ किलो उचलत त्याने स्वत:चाच विक्रम मोडला. मलेशियाच्या मोहम्मद इझार याने २६१ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, श्रीलंकेच्या चतुरंग लकमल याने २४८ किलो वजनासह कांस्यपदकाची कमाई केली.