आके येथे कराटे वर्ग

0
127

‘एसकेजेएफआय’ कराटे स्कूलतर्फे मुलामुलींच्या नवीन कराटे वर्गांसाठी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मडगावातील आके विद्यानगर येथील विद्याभुवन कोकणी शाळेमध्ये सदर वर्ग घेण्यात येणार आहेत. मंगळवार व शुक्रवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत वर्ग होतील. ६ एप्रिलपासून वर्गाला प्रारंभ होणार आहे. हे वर्ग कराटे असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रेडिशनल कराटे असोसिएशन गोवा यांच्याशी संलग्न असून त्यांना गोवा क्रीडा प्राधिकरणाची मान्यता आहे. अधिक माहितीसाठी गौरीश दाभोळकर (९८५०४६८६१८) यांच्याशी संपर्क साधावा.