मॅजेलनने करार संपवला

0
140

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख पुरस्कर्ते असलेल्या मॅजेलनने आपला करार संपुष्टात आणला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत असलेला करार मॅजेलनने स्वत: मोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खेळाविषयी असणारी प्रतिष्ठा, अखंडता, उत्कृष्ट नेतृत्व, समर्पण यावर आमची भागीदारी आधारित होती. पण ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी जिंकण्यासाठी नियम तोडले. जे कधीही मान्य करता येणार नाही, असे मॅजेलनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हामिश डग्लस यांनी म्हटले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मॅजेलनने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत २० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (१०० कोटी रुपये) तीन वर्षाचा करार केला होता.