स्मिथला अश्रू आवरेना

0
212

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने गुरुवारी पत्रकार परिषदेत सगळ्या क्रीडाप्रेमींची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने त्याच्या डोळ्यातून अनेकवेळा पाणी आले आणि आपण भयंकर मोठी चूक केल्याचे त्याने मान्य केले. ‘मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्याप्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. चेंडूशी छेडछाड करणे ही माझी घोडचूक होती,’ अशी कबुली स्मिथने दिली. हे सांगतानाच त्याला रडूही कोसळले. उर्वरित आयुष्यभर ही चूक विसरणार नाही असेही त्याने म्हटले. जसा काळ जाईल त्याप्रमाणे मला लोकांचे प्रेम आणि आदर परत मिळेल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. ही घटना म्हणजे माझ्या नेतृत्वाचाच पराभव असल्याचे स्मिथने साश्रू नयनांनी कबूल केले आहे.