राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या जवळ असलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद पडलेल्या मद्यालयांबाबत तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीची एक बैठक आज बुधवारी होणार आहे. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, महसूलमंत्री रोहन खंवटे व नगर आणि नियोजन मंत्री विजय सरदेसाई या तीन सदस्यीय मंत्र्याची ही समिती आहे.