आयर्लंड विजयी

0
84

आयर्लंडने विश्‍वचषक पात्रता स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ फेरीतील लढतीत काल रविवारी स्कॉटलंडचा २५ धावांनी पराभव करत विश्‍वचषक प्रवेशाच्या अंधुक आशा कायम राखल्या. यासाठी त्यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल तसेच स्कॉटलंड व झिंबाब्वेने आपले अखेरचे सामने जिंकण्याची वाटदेखील पहावी लागणार आहे.

कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून स्कॉटलंडने ढगाळ वातावरणाच्या फायदा घेण्याच्या उद्देशाने आयर्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. अँडी बालबिर्नी (१०५) व नायल ओब्रायन (७०) यांनी तिसर्‍या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी रचताना संघाला ९ बाद २७१ अशी सन्मानजनक स्थिती गाठण्यास मदत केली. स्कॉटलंडकडून व्हील याने ३ व आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना काईल कोएट्‌झर (६१) यांनी प्रामुख्याने बॉईड रँकिनवर तुटून पडताना आक्रमक पवित्रा अवलंबला. रँकिनने या हल्ल्यातून सावरताना स्कॉटलंडच्या इतर फलंदाजांना जखडून ठेवत गडीदेखील बाद केले. त्याने ६३ धावा मोजून ४ गडी बाद करत संघाला पुनरागमन करून दिले. सिमी सिंगने ३३ धावांत २ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.