Home बातम्या कुठ्ठाळीच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसची आज बैठक

कुठ्ठाळीच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसची आज बैठक

0

कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवाराबाबत चाचपणी करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची आज अनौपचारिक बैठक होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

कुठ्ठाळीत कॉंग्रेस उमेदवार निवडून आणण्यास अन्य काही प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आले नसल्याचे कळते. दरम्यान, कॉंग्रेसला नव्या अध्यक्षपदासाठीही अद्याप उमेदवार न सापडल्याने सध्या सुभाष शिरोडकर यांनाच या पदाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिरोडकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सादर केला होता. परंतु पक्षाने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार सध्या वरीलपद स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे कळते.