वार्का क्लबला नागवा पंचायत चषक

0
85

वार्का स्पोटर्‌‌स क्लबने दवर्लीच्या स्पोर्टिंग क्लबला २-१ असे पराजित करत नागवा पंचायत चषक आपल्या नावे केला. रोझमन क्रुझ स्पोटर्‌‌स क्लबने आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना काल रविवारी नागवा मैदानावर खेळविण्यात आला. सामन्याच्या १०व्या मिनिटाला जोनास डिकॉस्टा याने वार्का क्लबकडून पहिला गोल केला. २६व्या मिनिटाला नॅश परेराने आघाडी दुप्पट केली.

अंतिम टप्प्यात ५०व्या मिनिटाला मॅक बोर्जिसने दवर्लीकडून गोल नोंदविला. बक्षीस वितरण समारंभाला नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसोझा प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी नागवाचे सरपंच त्रिनिदाद परेरा इ रॉड्रिगीस यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले. विजेत्यांनी ४० हजार रुपये व चषकाची कमाई केली. उपविजेत्यांना ३० हजार रुपये व चषकावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक बक्षिसे ः शिस्तबद्ध संघ ः सी. डी. जे. रायबंदर, अंतिम सामन्यातील सर्वोत्तम आघाडीपटू ः नॅश परेरा, अंतिम सामन्यातील सर्वोत्तम बचावपटू ः पिएदाद कुलासो, अंतिम सामन्यातील सर्वोत्तम गोलरक्षक ः मोहम्मद शेख, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ः हिल्टन फर्नांडिस.