मुख्यमंत्री पर्रीकरांकडून उपचारांना प्रतिसाद

0
185

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये तिसर्‍या दिवशी उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारांना प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

रविवारी रात्री मुख्यमंत्री पर्रीकर यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांची विचारपूस करण्यासाठी गोमेकॉमध्ये हितचिंतकांची संख्या वाढत चालली आहे. राजकीय नेते व हितचिंतक हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विश्रांती न घेता पुन्हा कामकाजाला सुरूवात केल्याने प्रकृतीवर ताण आल्याची शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्य स्थितीवर चर्चा झालेली आहे.