हज यात्रेकरुंच्या विमान तिकिट दरात कपात

0
209

हज यात्रेला मक्केत जाणार्‍या मुस्लिम यात्रेकरुंसाठी विमान तिकिट दरात केंद्र सरकारने भरीव कपात केली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. मोदी सरकारचे हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. देशभरातील २१ विमानतळांवरून हजला भाविक जातात. एअर इंडिया, सौदी एअरलाईन्स व फ्लायनास यासह अन्य कंपन्यांच्या तिकिट दरात ही कपात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सरकारने हाज यात्रेकरुंना दिले जाणारे अनुदान बंद करण्याच्या घोषणेनंतर एका महिन्याने ही दर कपात होत आहे.