Home बातम्या पंचायत आरक्षणात किंचित दुरुस्ती

पंचायत आरक्षणात किंचित दुरुस्ती

0

पंचायत निवडणुकींसाठी चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर काल पंचायत संचालक मिनीन डिसोझा यांनी १७ पंचायतींच्या प्रभाग आरक्षणात दुरुस्त्या केल्या.

अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठीच्या प्रभाग आरक्षणात या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकीसाठी १७ तालुका व १४ जिल्हा निरीक्षकांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३पासून मद्यालये रात्री ११पासून बंद ठेवण्याचा आदेश काढला असून दि. १५१८ पर्यंत कोरडे दिवस पाळण्यात येतील.