दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना तसेच मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडिया येऊन ठेपली आहे. यजमानांनी विजयासाठी ठेवलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ३५ अशी दयनीय स्थिती झाली आहे. सलामीवीर राहुल (४), विजय (९) आणि कर्णधार कोहली (५) बाद झाल्याने पराभवाची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
तत्पूर्वी, गोलंदाजांनी अचूक मारा करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांमध्ये संपवला. त्यांच्या डीव्हिलियर्स तसेच एल्गरने केलेली अर्धशतकीय खेळी आणि ड्युप्लेसीच्या ४८ धावांच्या खेळीमुळे यजमानांचा २५० धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताकडून मोहम्मद शामीने ४, बुमराहने ३, इशांत शर्माने २ आणि आर. अश्विने एक बळी घेतला.
धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद ३३५, भारत पहिला डाव ः सर्वबाद ३०७
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव (२ बाद ९० वरून) ः डीन एल्गार झे. राहुल गो. शामी ६१, एबी डीव्हिलियर्स झे. पटेल गो. शामी ८०, फाफ ड्युप्लेसिस झे. व गो. बुमराह ४८, क्विंटन डी कॉक झे. पटेल गो. शामी १२, व्हर्नोन फिलेंडर झे. विजय गो. इशांत २६, केशव महाराज झे. पटेल गो. इशांत ६, कगिसो रबाडा झे. कोहली गो. शामी ४, मॉर्ने मॉर्कल नाबाद १०, लुंगी एनगिडी झे. विजय गो. अश्विन १, अवांतर ८, एकूण ९१.३ षटकांत सर्वबाद २५८
गोलंदाजी ः रविचंद्रन अश्विन २९.३-६-७८-१, जसप्रीत बुमराह २०-३-७०-३, इशांत शर्मा १७-३-४०-२, मोहम्मद शामी १६-३-४९-४, हार्दिक पंड्या ९-१-१४-०
भारत दुसरा डाव ः मुरली विजय त्रि. गो. रबाडा ९, लोकेश राहुल झे. महाराज गो. एनगिडी ४, विराट कोहली पायचीत गो. एनगिडी ५, पार्थिव पटेल नाबाद ५, अवांतर १, एकूण २३ षटकांत ३ बाद ३५
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर ६-३-६-०, कगिसो रबाडा ५-२-९-१, लुंगी एनगिडी ६-२-१४-२, मॉर्ने मॉर्कल ५-३-४-०, केशव महाराज १-०-१-०.
सहाच्या जागी कार्तिक
जायबंदी यष्टिरक्षक वृध्दिमान साहा याच्या जागी तिसर्या कसोटी सामन्यासाठी दिनेश कार्तिक याची निवड करण्यात आली आहे. सराव करताना ११ जानेवारी रोजी साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसर्या कसोटीत त्याला खेळता आले नव्हते.
कोहलीला दंड
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अपशब्द वापरल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे विराटला सामन्याच्या मानधनातली २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. तसेच त्याच्या खात्यात एक दोषांकही जमा होणार आहे.