शम्मी कपूर यांचे निधन

0
83

सिनेजगताशी घनिष्ट नाते असणार्‍या कपूर घराण्यातील आणि सुपरस्टार राज कपूर आणि शशी कपूर यांचे बंधू असलेल्या शम्मी यांचे निधन काल (रविवारी) पहाटे ५.१५ वा. ब्रीच कँडी इस्पितळात मूत्रपिंड विकाराने झाले.

त्यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यांची मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे काही काळापासून त्यांना डायलिसीसवर ठेवले गेले होते.