गोव्याच्या नितीश बेलुरकर याने स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झालेल्या रिल्टन चषक आंतरराष्ट्रीय ब्लिट्झ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने तिसरा क्रमांक प्राप्त केला. रशियाचा ग्रँडमास्चर वालेरी पोपोव या स्पर्धेचा विजेता ठरला. नितीशला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी या स्पर्धेत त्याने विजेत्या पोपोव याच्यावर मात करत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. या कामगिरीच्या जोरावर त्याने ७२ इलो गुणांची कमाई केली. गोवा कार्बन लिमिटेडची सदिच्छा दूत असलेल्या भक्तीने आपल्या खात्यात ३६ इलो गुण जमा केले. या कामगिरीमुळे आयोजकांनी नितीश व भक्तीला ३ जानेवारीपासून सुरू होणार्या व रिल्टन चषकाचाच भाग असलेल्या अन्य एका ब्लिट्झ स्पर्धेत खेळण्याचे निमंत्रण दिले आहे.