नवीन कॅसिनो धोरण १५ दिवसांत जाहीर

0
81

नवीन कॅसिनो धोरण येत्या पंधरा दिवसात जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मांडवी नदीतून कॅसिनो बाहेर काढण्यासाठी नवीन कॅसिनो धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. नवीन कॅसिनो धोरणात नवीन कॅसिनो सुरू करण्यास मान्यता न देण्याची तरतूद केली जाणार आहे. तसेच गेमिंग कमिशनरची नियुक्तीची तरतूद केली जाणार आहे. या नवीन कॅसिनो धोरणात मांडवी नदीतील कॅसिनो बाहेर काढण्यासाठी कालमर्यादा घातली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा जुगार कायद्यात दुरूस्ती करण्याचा संकेत मुख्यमंत्री पर्रीकर दिला आहे.