शालेय स्पर्धेसाठी वुशू संघ जाहीर

0
120

जम्मूमधील एम.ए. स्टेडियमवर १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार्‍या ६३व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या मुलांचा अंडर १७ व अंडर १९ संघ सहभागी होणार आहे. क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या झेंड्याखाली हा संघ सहभागी होत आहे. वरिष्ठ प्रशिक्षक पावलो किलमन फर्नांडिस, ज्युनियर प्रशिक्षक ऍन्सन फर्नांडिस व संघ व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर सावंत संघासोबत जाणार आहेत. १७ वर्षांखालील संघात सर्वेश हरमलकर, काईल फर्नांडिस, ओमकार सावंत, हर्ष काळोजी, रोहित परब, गणेश शेटगावकर यांचा तर १९ वर्षांखालील संघात रामकुमार भारतीय, विष्णू चव्हाण, अलॉयसियस लोबो, मोहम्मद अलफ्रान खान, तोशिब कबनूर, रोशन भंडारी, उमर अहमद, साईदीप नागवेकर व मंजीष ओटवणेकर यांचा समावेश आहे.