‘महाराष्ट्र डर्बी’त पुणे सिटीची सरशी

0
113

सामन्याच्या भरपाई वेळेत एमिलियानो अल्फारो याने नोंदविलेल्या गोलमुळे एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीवरून यजमानांनी मुसंडी मारताना मुंबई सिटी एफसीला २-१ गोलफरकाने हरविले. संघर्षपूर्ण ठरलेला ‘महाराष्ट्र डर्बी’ सामना काल बुधवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मैदानावर झाला.

सामन्याच्या पूर्वार्धात १५व्या मिनिटास बलवंत सिंगने मुंबई सिटीला आघाडी मिळवून दिली, नंतर उत्तरार्धात एमिलियानो अल्फारो याने ७४व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर पुणे सिटीला बरोबरी साधून दिली. चार मिनिटांच्या भरपाई वेळेत अल्फारोने सामन्यातील दुसरा वैयक्तिक गोल नोंदवून पुणे सिटीला सलग दुसरा विजय मिळवून दिला. दिएगो कार्लोसकडून मिळालेल्या मुंबईचा गोलरक्षक अमरिंदरला अल्फारोने संधीच दिली नाही. यावेळी त्याला रोखण्यासाठी मुंबईचा एकही बचावपटू जाग्यावर नव्हता.