रविचंद्रन अश्‍विनचे फास्टटेस्ट ३०० बळी

0
106
Indian cricketer Ravichandran Ashwin celebrates after taking the wicket of Sri Lankan batsman Dilruwan Perera during the fourth day of the second Test cricket match between India and Sri Lanka at the Vidarbha Cricket Association Stadium in Nagpur on November 27, 2017. / AFP PHOTO / PUNIT PARANJPE / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

भारताचा ऑफ ब्रेक गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन याने आपल्या ५४व्या कसोटीत ३०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वांत वेगवान खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांना यासाठी ५६ कसोटी सामने खेळावे लागले होते. डावांचा विचार केल्यास श्रीलंकेचा ऑफ ब्रेक गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने ५८ कसोटींत ३०० बळी पूर्ण केले होते. डावांचा विचार केल्यास मुरलीधरनने ९१ डावांत तर अश्‍विनने १०१ डावांत त्रिशतकी बळींचा टप्पा गाठला आहे. अश्‍विनच्या ३०० पैकी केवळ ८४ बळी भारताबाहेर आहेत. तर यातील केवळ ४१ बळी भारतीय उपखंडाबाहेरील आहेत. भारताकडून अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) व झहीर खान (३११) यांना अश्‍विनपेक्षा जास्त बळी घेतले आहेत.