Home बातम्या मतदानयंत्रांतील फेरफारामुळेच पराभवाचा नार्वेकरांचाही दावा

मतदानयंत्रांतील फेरफारामुळेच पराभवाचा नार्वेकरांचाही दावा

0

कॉंग्रेस नेत्यांच्या हल्लीच झालेल्या बैठकीत मतदानयंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केला गेल्याचे नार्वेकर यांचे म्हणणे आहे. या बैठकीला आपण स्वतः, रवी नाईक, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सिल्वेरा, प्रताप गावस, जुझे फिलीप डिसोझा ही मंडळी हजर होती. मतदान यंत्रात कसे फेरफार केले गेले त्याची सीडी चर्चिल आलेमाव यांनी यावेळी दाखवली, ती पाहिल्यानंतर मतदान यंत्रात फेरफार केल्याच्या वृत्तावर आपला विश्वास बसल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

सदर बैठकीत मनोहर पर्रीकर यांचे सरकार पाडण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त पसरवले गेले असले तरी ते निराधार असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

ऍलिनांना पाठिंबा द्यावा : नार्वेकर

लोकनेते माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी ऍलिना साल्ढाणा या कुठ्ठाळीतून निवडणुकीत उतरल्या तर कॉंग्रेस पक्षाने त्यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा न करता त्यांना निवडून येऊ द्यावे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचेही ऍड. दयानंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.