
>>‘यंग फिल्म मेकर्स ऑफ इंडिया’ : भास्कर हजारिका यांचे मत
‘यंग फिल्म मेकर्स ऑफ इंडिया’ या पैनल चर्चेत कार्तिक सुब्बाराज, आर. एस. प्रसन्ना, भास्कर हजारिका, राजा कृष्ण मेनन यांनी सहभाग घेतला. त्याचे सूत्रसंचालन फिल्म निर्माता अश्विनी अय्यर यांनी केले.
भास्कर हजारिका यांनी सांगितले, चित्रपट क्षेत्रात सब टायटल असलेले चित्रपटही तितकेच चमकले. भारतातील लोक कोरियन चित्रपट बघतात, तसेच मणिपुरी चित्रपटही पाहतात. मी मुंबईत खूप संघर्ष केला. त्यावेळी असे जाणवले की, हिंदी माझी पहिली भाषा नाही. यावेळी मला अनेक निर्मार्त्यांनी सर्व भाषांमध्ये चित्रपट बनविण्याचा सल्ला दिला होता.
आर. एस. प्रसन्ना म्हणाले, बेरोजगार राहिल्यावर खूप कठीण समस्या उद्भवतात. चित्रपट निर्माता नसतानाही चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळते.
‘कल्याणा समायल साधम’ हा चित्रपट बनविताना मी या प्रसंगातून गेलेलो आहे. यावेळी लोकांशी बोलण्याची संधी मिळते. लोकांच्या मनात अनोखे विचार असतात, ते जाणून घेता येतात.
राजा कृष्ण मेनन म्हणाले, माझी ओळख ही ‘बारह आना’ चित्रपटांपासून झाली. चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित केला होता. वेगळ्या ढंगात मी हा चित्रपट बनविला होता.