
शिव कपूर याने काल रविवारी पॅनासोनिक ओपन स्पर्धा जिंकून मायदेशात प्रथम आशियाई टूर किताबाला गवसणी घातली. दिल्ली गोल्फ क्लबवर त्याने चौथ्या व शेवटच्या फेरीत चार अंडर ६८ गुणांनंतर केवळ तीन फटक्यांनी त्याने विजेतेपदावर नाव कोरले. यंदाच्या मोसमात मिळविलेले कपूरचे हे दुसरे आशियाई टूर जेतेपद ठरले. कपूरने पाच बर्डी व केवळ एक गोली लगावून भारताच्या अजीतेश संधू (६५), सुधीर शर्मा (६९) व चिराग कुमार (६४) यांना आपल्या जवळपास फिरकू दिले नाही. एप्रिल महिन्यात यिएंगडर हॅरिटेज स्पर्धा आपल्या नावे केल्यानंतर वर्तमान मोसमात त्याने थायलंड ओपनचे उपविजेेतेपद प्राप्त केले होेते. २००५ साली वॉल्व्हो मास्टर्सद्वारे त्याने आपले पहिलेवहिले आशियाई टूर विजेतेपद मिळविले होते.