राजकोट येेथे काल बुधवारी संपलेल्या कर्नल सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सौराष्ट्रने गोव्याचा ९ गडी राखून दारूण पराभव केला. सौराष्ट्रच्या पहिल्या डावातील ४२८ धावांना उत्तर देताना गोव्याचा पहिला डावा २६० धावांत संपला होता.
फॉलोऑननंतर पुन्हा फलंदाजी करताना गोव्याचा दुसरा डाव २२५ धावांत आटोपला. कहलोन याच्या ८६ धावांमुळे गोव्यावर किमान डावाच्या पराभवाची नामुष्की ओढवली नाही. सौराष्ट्रने यानंतर विजयासाठी आवश्यक ५८ धावा केवळ १ गडी गमावून केल्या. अझिझ कोठारिया (१३) याच्या मोबदल्यात त्यांनी १ बाद ५९ धावा बनवल्या. गोव्याचा पुढील सामना २६ ऑक्टोबरपासून राजस्थानविरुद्ध खेळविला जाणार आहे.