Home बातम्या पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार

0

पश्चिम बंगालमध्ये सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. लोकभवन येथे आयोजित एका समारंभात राज्यपाल आर. एन. रवी यांनी 35 नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे उपस्थित होते. 13 जणांची कॅबिनेट मंत्री, तीन जणांची स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 19 जणांची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या विस्तारामुळे बंगालच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 41 झाली आहे.

9 मे रोजी शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी दिलीप घोष, अग्निमित्र पॉल, निशिथ प्रमाणिक, अशोक कीर्तनिया आणि क्षुदिराम टुडू यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली होती. घटनेच्या 91व्या घटनादुरुस्तीनुसार, राज्य मंत्रिमंडळातील आमदारांची संख्या विधानसभेतील एकूण आमदारांच्या 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.