बेती येथे काल मोटारसायकल आणि बस यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11.45 च्या सुमारास हा अपघात घडला. बेती वाळकेश्वर वाडा येथे आकाशकुमार (26, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) आपल्या दुचाकीवरून (क्र. जीए-03-एके-4684) वेरे ते मालीमच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला (क्र.जीए-03-व्ही-0186) धडक दिली व तो रस्त्यावर कोसळला. गंभीररीत्या जखमी झालेल्या आकाशकुमार याला गोमेकॉमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोमेकॉमध्ये जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.