Home बातम्या घटक राज्य दिनालाउपराष्ट्रपती येणार

घटक राज्य दिनालाउपराष्ट्रपती येणार

0

गोवा घटक राज्यदिनानिमित्त भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे दि. 30 मे रोजी गोवा दौऱ्यावर येत असून, ते घटक राज्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम येथील कला अकादमीत दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी सरकारी उपक्रमाचा आढावा घेण्याबरोबरच राज्याने केलेल्या विकासासंबंधीची सादरीकरणेही करण्यात येणार आहेत. त्याशिवाय भरगच्च असा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. उपराष्ट्रपतींचे गोव्यात आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यासाठीची तयारी सुरू केलेली असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,मंत्रिगण, अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी गृह खात्याने हाती घेतली आहे.