आलुर-बंगळुरू येथे ७ ते १४ ऑक्टोबरपर्यंत होणार्या १९ वर्षांखालील विनू मांकड वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी युवा द्रुतगती गोलंदाज हेरंब परब याची गोव्याच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गोवा क्रिकेट संघटनेने काल १५ सदस्यीय युवा संघाची घोषणा केली.
घोषित संघ पुढीलप्रमाणे ः आलम खान, मंथन खुटकर, राहुल मेहता, तनिश सावकर, दिगेश रायकर, उमंग गोसावी, हेरंब परब (कर्णधार), आदित्य सूर्यवंशी (यष्टिरक्षक), ऋत्विक नाईक, समित आर्यन मिश्रा, बलप्रीत चढ्ढा, शाणू वांतामुरी, साविको कालको, ओमप्रकाश चव्हाण, मोहित रेडकर. संघ प्रशिक्षक म्हणून प्रशांत काकोडे हे काम पाहतील.