गोवा मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भरत देशपांडे यांनी काल स्वीकारली. गोवा मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद गेले कित्येक महिने रिक्त होते. राज्य सरकारने आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता ताबा आयोगाचे सदस्य निवृत्त जिल्हा न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश भरत देशपांडे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.