Home बातम्या सुसाईड नोटमधीलतपशील आले समोर

सुसाईड नोटमधीलतपशील आले समोर

0

बिट्स पिलानी कॉलेजमध्ये पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या अर्जुन साबू या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. सदर विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाच जबाबदार धरू नका’ असे म्हटले आहे. ‘मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने व्हेरी सॉरी. मी आयुष्याला कंटाळलो आहे’ असा उल्लेखही त्याच्या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. अर्जुनने मागे सोडलेली एक पानी ‘सुसाइड नोट’ तपासल्यानंतर तो गेले काही काळ मानसिक तणावाखाली आणि अस्वस्थ होता का? याची चौकशी पोलीस करत आहेत. गुरुवारी अर्जुनच्या मृतदेहावर शवचिकित्सा करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. केरळमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.