वेर्णा लोटली रस्त्यावर काल सकाळी एका वाहनाच्या धडकेने मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. मृत तरुणाची ओळख पटविण्यात मायणा कुडतरी पोलिसाना यश आले. प्रमोद निषाद असे त्याचे नाव असून, तो नोकरीच्या शोधात गोव्यात आला होता. काल चालत जात असताना त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक बसली आणि शेतात फेकला गेला. जखमीला तेथेच सोडून पलायन केलेल्या वाहनचालकाला पोलिसांनी शिरोडा येथे ताब्यात घेतले व वाहन जप्त केले. या प्रकरणी वाहनचालक विजय श्रेस्था (51) याला अटक केली असून, तो मुंबई येथील आहे.